
रत्नागिरीतील आकाशवाणीचे ए ग्रेड मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली सात गीते रसिकांच्या भेटीला
रत्नागिरीतील आकाशवाणीचे ए ग्रेड मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली गणपती गीते गणेशोत्सवानिमित्ताने शिवतनया विघ्नेशा शीर्षकांतर्गत रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.आज १० सप्टेंबरला सकाळी ७ वाजता गणेश चतुर्थीला ७ गीते कला वैभव अवधूत बाम युट्यूब चॅनेलवर रिलीज हाेत आहेत
शिवतनया, गणेश पाळणा गीत, बाप्पा आला, कमानी सजवा, रत्ननगरीच्या राजा, गणपती बाप्पा सांगा, पारंपारिक आरती अशी एकूण ७ गीते आहेत.
ही गीते गायक स्वप्नील गोरे, दिव्या आपटे, ज्ञानेश्वरी चिंदरकर, करूणा रानडे-पटवर्धन, अभिजित भट, अभिषेक भालेकर यांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. याचे संगीत संयोजन निशांत लिंगायत व गणेश घाणेकर यांनी केले असून तबलासाथ अभिषेक भालेकर, पखवाजजाथ प्रथमेश तारळकर यांची आहे. लेखन व निवेदन अनुया बाब यांचे असून गीतांसाठी शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी यांचे संगीत मार्गदर्शन लाभले आहे. यासाठी प्रसन्न दाते यांचे विशेष तांत्रिक सहाय्य लाभले आहे. रसिकांनी गणेशोत्सवात या गीतांचा आस्वाद घेण्याचे आवाहन संगीतकार अवधूत बाम यांनी केले आहे. www.konkantoday.com