रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे फोटो स्टुडिओ आणि टायरचे दुकान फोडले
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील फोटो स्टुडिओ आणि टायरचे दुकान फोडून अज्ञाताने दोन्ही दुकानांतून सुमारे २५,८१० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना सोमवारी, घडली आहे.याबाबत प्रदीप प्रभाकर हरचिरकर (वय ३९, रा. जागुष्टे कॉलनी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने हरचिरकर यांच्या दर्पण फोटो स्टुडिओचे लॉक तोडून व सिमेंट पत्रे उचकटून ५ हजार रुपयांचा कॅमेरा, १ हजार रुपयांचा फ्लॅश लाईट आणि त्यांच्या शेजारील दुर्गा टायर दुकानातून १७ हजार ८१० रुपयांचे टीव्हीएस कंपनीचे १३ टायर, ३ हजार ६०० रुपयांचे एमआरएमचे २ टायर आणि ४ हजार ४०० रुपयांचे सीईटी कंपनीचे २ टायर असा एकूण २५,८१० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत
www.konkantoday.com