मंडणगड मध्ये घराला आग लागून मोठी वित्त हानी
मंडणगड बाणकोट येथील इस्माइल उंडरेच्या यांच्या घराला आग लागण्याची घटना घडली.घरावर वेल्डिंगचे काम करताना ठिणगी उडुन आग लागल्याची माहिती मिळत आहे.घरातील गादी व इतर समानाला आग लागून जवळपास सात लाखाचे नुकसान झाले आहे.आग विझविण्यासाठी मंडणगड नगरपंचायतिचा अग्निशमनचा बंब घटनास्थळी दाखल झाला.सुदैवाने जीवितहानी टळली मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.