पॅसेंजर गाड्या गणेशोत्सव काळात सुरू होत असल्याने या मार्गावरील छोटी स्थानके गजबजणार

कोकण रेल्वे मार्गावरील प्रदीर्घ काळ बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या गणेशोत्सव काळात सुरू होत असल्याने या मार्गावरील छोटी स्थानके पुन्हा एकदा गजबजणार आहे. पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू होणार असल्याने गणेशभक्तांचा प्रवास अधिकच सुखकर हाेणार आहे.
काेराेनामुळे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रत्नागिरी- दादर आणि दिवा-सावंतवाडी या दाेन्ही पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर काही दैनंदिन एक्स्प्रेससह हंगामी गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, दोन्ही पॅसेंजर बंदच होत्या. दोन्ही पॅसेंजर सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी सुरू होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button