
भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले
संवेदनशील असलेल्या कणकवलीत आज पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कणकवलीच्या श्रीधर नाईक चौकातील शिवसेना शाखे बाहेर सोमैया यांची दोन वर्षापूर्वी नारायण राणेंवरील ईडीच्या मागणीचा व्हिडिओ डिस्प्ले लावण्यात आला आहे.त्यातच सोमय्या यांचे या चौकात दुपारी स्वागत झाल्यानंतर तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवल्याने तूर्तास हा वाद शमला आहे.
www.konkantoday.com