
प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वंचित जंगलातील व नुकसान झालेल्या व दरडग्रस्त अतिवृष्टी झालेल्या भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेवून सातत्याने प्रयत्न केला आहे.प्रविण काकडे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सिनेअर्क प्रॉडक्शन मुंबईच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल पुणे येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रपती पदक विजेते युसून पठाण, उपायुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते व सिने अर्क प्रॉडक्शनचे चेअरमन विनोद खैरे व ज्ञानेश्वर मोळक अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयदेव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.www.konkantoday.com