पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून मंत्री नारायण राणे यांनी स्वीकारले आभारपत्र
केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुवारबाव भाजप कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी सर्वांसाठी घर २०२२ व पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांची भेट घेतली व त्यांचे आभारपत्र स्वीकारले.
जन आशीर्वाद यात्रेसाठी मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. मंत्री राणे हे कुवारबाव येथे आले असता त्या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीत सतेज नलावड़े यानी त्यांचे स्वागत केले.
केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना ते ज्या बेघरांनाही जमीन देऊन घर बांधून मिळणार आहे त्यासाठी त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून १ लाख ३० हजार रुपये, जमीन खरेदीसाठी ५० हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ या गावातील अनेक लाभार्थी गरीब लोकांना होत आहे. त्यांना मंत्री राणे यांच्या भेटीमुळे खूप आनंद झाला.
या भेटीप्रसंगी माजी खासदार आणि प्रदेश भाजपचे चिटणीस नीलेश राणे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सरपंच मंजिरी पाडळकर, माजी आमदार बाळ माने, ग्रामपंचायत सदस्य अनुश्री आपटे, नेहा आपकरे, गणेश मांडवकर व भाजपा कार्यकर्ते रोहन वारेकर, विशाल खेर, अभिजित मांडवकर, नितीश अपकरे, धनंजय जोशी, रामचंद्र कांबळे,भाजपा शक्ती केंद्रप्रमुख दीपक आपटे उपस्थित होते.
www.konkantoday.com