मोरवंडे पिंपळवाडीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन ग्रामस्थामध्ये चिंतेचे वातावरण

खेड : खेड तालुक्यातील मोरवंडे पिंपळवाडी येथे मानवी वस्तीनजीक दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होवू लागले असल्याने ग्रामस्थांमध्ये
प्रचंड भितीचे वातावरण आहे. भक्षाच्या शोधात अगदी घराच्या अंगणात येणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बिबट्याने दर्शन दिले होते. रस्त्यात मधोमध बसलेला बिबट्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पाहिला होता. त्यानंतर या बिबट्याने भोस्ते गावच्या हद्दीत येणाऱ्या जंगलामध्ये
जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना दर्शन दिले होते. मात्र आता हा बिबट्या मोरवंडे पिंपळवाडी येथे मानवी वस्तीत दिसू लागला
असल्याने बिबट्याच्या भितीने ग्रामस्थ घराबाहेर पडेनासे झाले आहेत. काही दिवसांपुर्वी मोराडे-भोस्ते गावाची सिमा असलेल्या अलसुरे
गावात बिबट्यांना पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांचा पडशा पाडला होता. त्यानंतर या परिसरात या बिबट्याचे वास्तव्य असल्याचे
अनेकांनी पाहिले होते आता या बिबट्याने आपले ठिकाणी बदलले असून अलसुरे येथील जंगलातून तो आता भोस्ते मार्गे मोरवंडे
पिंपळवाडी येथे दाखल झाला आहे. आठ दिवसापर्वी पिंपळवाडी येथील एक गृहिणी रानात चरण्यासाठी गेलेल्या म्हशी आणण्यासाठी भोस्ते येथील
जंगलात गेली होती. त्यावेळी तीच्यासोबत तीचा 10 वर्षाचा नातूही होता. रानात अचानक बिबट्याने डरकाळी फोडल्याने तीचा नातू आणि ती
कमालीची घाबरून गेली. रानात चरायला गेलेल्या म्हशी तशाच सोडून त्यांनी घर गाठले. त्यानंतर या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन
होवू लागले असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मोरवंडे पिंपळवाडी, बौद्धवाडी येथील अनेकजण लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात. दुसऱ्या पाळीतील कामगार रात्री उशीरा घराकडे येतात. त्यामुळे मुंबई गोवा हायवे ते मोरवंडे पिंपळवाडी-बौद्धवाडी या
रस्त्यावर रात्री उशीरापर्यंत कामगारांची वर्दळ असते. गेले दोन दिवस दर्शन देणारा बिबट्या या वर्दळीच्या रस्त्याशेजारीच ठाण माडून
बसल्याचे निदर्शनास येत असल्याने रात्री-अपरात्री कामावरून उशीरा घरी येणाऱ्या कामगारांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढविणाऱ्या या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button