पिंपळी येथील ब्रेक टेस्टिंग ट्रॅक सुरू

गेले काही दिवस गाजत असलेल्या चिपळूण तालुक्यातील पिंपरी येथील ब्रेक टेस्टिंग ट्रॅक सुरू झाला आहे. परिवहन खात्याने गुरुवारपासून या ट्रॅकचा वापर सुरू केला.चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण व परिवहन विभागाचे अधिकारी संजय कांबळे यांनी परत एकदा नारळ वाढवून ट्रॅकचा शुभारंभ केला.काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत व आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते या ट्रॅकचे उद्घाटन झाले होते परंतु त्यानंतर हा ट्रॅक सुरू होत नसल्यामुळे संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू खेतले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता शेवटी हा ट्रॅक कालपासून सुरू झाला काल २५ वाहनांचे पासिंग येथे करण्यात आले या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्याने उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांच्या वाहनधारकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button