
८५ वयापेक्षा जास्त असलेल्या मतदारांनी मतदान केंद्रावरच जाऊनच मतदान करण्याचा निर्णय घेतला
रत्नागिरी जिल्ह्यातील २६ हजार १८१ मतदार ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. मात्र यापैकी फक्त ४१४ मतदारांनीच गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली आहे. उर्वरित सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जावून बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५ हजार ६७९ दिव्यांग मतदारांपैकी फक्त ५४ दिव्यांगानीच १२-ड हा अर्ज भरला आहे. त्यामुळे उर्वरित मतदार मतदान केंद्रांवर जावूनच मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक-२०२४ साठी आता विविध पक्षातील उमेदवार आता उमेदवारी अर्ज भरू लागले आहेत. याच सोबत निवडणूक विभाग प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून मतदानासाठी प्रवृत्त करू लागले आहेत. निवडणूक प्रक्रियेतून कोणीही वगळू नये यासाठी दिव्यांग मतदार, ८५ पेक्षा जास्त वय असलेले मतदार तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्यांसाठी १२-ड चाा फॉर्म भरून गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सर्व बीएलओ प्रत्यक्ष घरभेटी घेवून मतदानासाठी प्रयत्न करत आहेत.www.konkantoday.com




