चिपळूण नगरपरिषद निवडणूक मतमोजणी दिवशी बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड मार्ग वाहतुकीस बंद


रत्नागिरी, दि. 17 : चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रीया दि. २१ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कूल, मार्कडी, चिपळूण येथे पार पडणार असल्याने मतमोजणी दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत सर्व वाहनांना बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येत असून बंद केलेल्या मार्गाला पर्यायी मार्ग बहादुरशेख नाका- पावर हाऊस-चिंचनाका तसेच चिंचनाका-पावर हाऊस – बहादुरशेख नाका या पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत.
चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ चे मतदान प्रक्रिया दि. २ डिसेंबर रोजी पार पडलेली असून दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी प्रक्रिया गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कुल,मार्कडी, चिपळूण येथे पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रिया मतमोजणी वेळी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने रस्त्यावर उपस्थित राहणार आहेत. मतमोजणी दिवशी वाहतूक कोंडी टाळणे गरजेचे आहे. त्याकरीता चिपळूण नगरपरिषद मतमोजणीचे वेळी दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत सर्व वाहनांना बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग वाहतुकीस बंद केलेल्या मार्गाला पर्यायी मार्ग बहादुरशेख नाका- पावर हाऊस-चिंचनाका तसेच चिंचनाका-पावर हाऊस – बहादुरशेख नाका या पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१)(अ)(ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जारी केले आहेत.

सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व

मा. मंत्री महोदय यांच्या दौ-याच्या अनुषंगाने पोलीसांनी परवानगी दिलेले वाहने यांना लागू होणार नाही.

निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेवू

शकतील, असेही आदेशात म्हटले आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button