
स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार काढून घेणारी सिडकोची अधिसूचना रद्द करण्याची आ. राजन साळवी यांची मागणी
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सिडकोच्या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार काढून न घेण्याची मागणी केली आहे.राज्य सरकारने ४ मार्च २०२४ रोजी अधिसूचनेनुसार नियोजन प्राधिकरण म्हणून कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी जागतिक टेंडर काढून भागीदार नेमण्याचे अधिकार सिडकोला देण्यात आले आहेत. याबाबत राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून ही अधिसूचना अंमलात न आणता स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com