
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या पगाराच्या गंभीर विषयाला मंत्री उदय सामंत यांनी हात घातला. ज्या एजन्सीद्वारे कामगारांची नियुक्ती केली आहे, त्या एजन्सीकडून किमान वेतन कायदा धाब्यावर बसविण्यात आला. कर्मचार्यांना केवळ ५० ते ६० टक्के पगार दिला जात आहे. सामंत यांच्यापर्यंत ही तक्रार गेल्यावर त्यांनी आर्थिक पिळवणूक करणार्या कंत्राटदाराला चांगलेच झापले. १५ कर्मचार्यांना किमान वेतनप्रमाणे पगार देण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com