कोकणातून महाबळेश्वरला जाणार्‍या आंबेनळी घाटात परत दरड कोसळली

महाबळेश्वरच्या आंबेनळी घाट रस्त्यावर काल सकाळी रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पुन्हा दरड कोसळली.जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट रस्त्याचे नुकसान झाले होते. आंबेनळी घाट रस्ता हा किल्ले प्रतापगड, तसेच कोकणाला जोडणारा हा मुख्य घाट रस्ता असल्याने गेल्या दीड महिन्यापासून रस्त्यावरील माती व मोठमोठे दगड हटविण्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणी संपूर्ण रस्ताच खचला होता. या खचलेल्या रस्त्यावर सध्या भराव टाकून जाळीचे बेड तयार करून त्या बेडमध्ये दगड भरण्याचे काम हाती घेण्यात आले असून, खचलेला रस्ता जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
हे काम सुरू असताना या रस्ते कामाच्या अलीकडे काल सकाळी दरड कोसळली. त्यामुळे मोठे दगड माती मुख्य रस्त्यावर आल्याने पुन्हा एकदा रस्ते कामात अडथळा निर्माण झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button