केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी पर्यटन सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी भेट घेवून पर्यटनाबाबत निधी व सुविधांबाबत केल्या मागण्या
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्नागिरी पर्यटन सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी भेट घेतली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन संस्था गेली अनेक वर्षे विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. याची माहिती त्यांनी यावेळी मा. राणे यांना दिली. याबाबत त्यांनी एक सविस्तर निवेदन केंद्रीय मंत्री ना. राणे यांना सादर केले. या निवेदनात त्यांनी पुढीलप्रमाणे मागण्या, समस्या मांडल्या.
- रत्नागिरी जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून फार मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून जर निधी आला तर रत्नागिरी जिल्ह्याचा योग्य प्रकारे विकास होऊन रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास सक्षम होईल.
- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रस्त्याची समस्या गंभीर असून अनेक रस्ते खराब झाले असून ते नवीन करणे जरूरीचे असून पर्यटकांना त्याच्यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्ते तात्काळ दुरूस्त करण्यात यावेत.
- रत्नागिरी जिल्ह्यामद्ये अनेक गड, किल्ले असून त्यांची अवस्था फार दयनीय झालेली असून त्यांची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. त्याकरिता निधीची आवश्यकता आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक समुद्र किनारे आहेत. तेथही पार्किंगची, टॉयलेटची, पाण्याची तसेच लाईटची व्यवस्था होणे जरूरीचे आहे. ह्या सर्व व्यवस्था समुद्रकिनारी झाल्यास तेथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
- रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असून त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन मंदिरे, स्मारके असून त्यांचाही विकास होणे गरजेचे आहे.
- रत्नागिरी शहरामध्ये लोकमान्य टिळकांचे स्मारक असून त्याचीही दुरवस्था झाली असून त्याच्या सुधारणेसाठी निधीची आवश्यकता आहे.
- मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले असून ते काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत. महामार्ग व्यवस्थित नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक येण्यास उत्सूक नसतो. त्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे.
- कोरोनाच्या काळात हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना केंद्र सरकारकडून योग्य ते पॅकेज देण्यात यावेत.
- पर्यटनावर आधारित अनेक कोर्सेस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू करावेत.
- रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, जेणेकरून पर्यटक त्या मार्गे येऊ शकतात.
- रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास होण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून सर्व्हे व्हावा व त्याप्रमाणे विविध योजना आणून रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा.
- रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्र सरकारने सीआरझेड नोटीफिकेशन २०१९ मधील पॉलिसी लवकरात लवकर ठरविणे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळेल.
- हजारो वर्षापूर्वीच्या मिळालेल्या कातळावर कोरलेले शिल्प यासाठी शासनाकडून विशेष निधी मिळावा.
- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन माहिती केंद्र उभारावे.
- रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना शासनाकडून व बँकांकडून सबसिडी व कमी व्याज दरात कर्ज मंजूर करावे, यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत.
- कोकणात येणार्या पर्यटकांसाठी व चाकरमान्यांसाठी फास्ट पॅसेंजर ही गाडी मुंबई ते सावंतवाडी अशी सुरू करण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडल्या. व याबाबतीत दखल घेण्याची विनंती केली. मा. राणे यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
www.konkantoday.com