कशेडी घाटात एसटीची डंपरला धडक; २१ प्रवाशी जखमी


खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डंपरला एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ब्रेक मारल्यावर एसटी स्लिप झाल्याने समोरून येणाऱ्या डंपरवर आदळली अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. जखमींना नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिका, १०८ आणि खेड येथील मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथून रत्नागिरी येथे प्रवाशी घेऊन निघालेले एसटी महामंडळाची एमएच-२०-बीएल-२४५९ या क्रमांकाची बस दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात आली असता एका वळणावर चालकाने अचानक मारलेल्या ब्रेकमुळे गाडी स्लिप होवून चिपळूण कडून महाडकडे जाणाऱ्या डंपरवर आदळली. या अपघातात एसटी बसचे चालक, वाहक तसेच अन्य प्रवाशी असे २१ जण जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅप वाहतुक पोलीस, महामार्ग मृत्युंजय दुत टिमचे सर्व सदस्य तसेच खेड येथील मदत ग्रुपचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढून नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिका, १०८ आणि खेड येथील मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कशेडी टॅप वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले असून आकाश दत्तात्रय पिंपळकर (३१) श्रद्धा आकाश पिंपळकर २४) रा. खेड, शशिकांत यशवंत घोसाळकर (५५), राजेश बबन शिरसाट (३५), (चालक) खुशाल अशोक सूर्यवंशी (३५) (वाहक) रा. नाशिक, प्रशांत राजेंद्र गायकवाड (३८) भरणे, संगिता सिताराम दोडकडे (५५), सानिका विनोद कांबळे (१८), रेश्मा विनोद कांबळे (३६) रा. कराड, दर्शना दशरथ मोरे (४५), दशरथ मनोहर मोरे (४९) रा. करंजाडी, अनंत नारायण मेस्त्री (७५) इंदीरा अनंत मेस्त्री (७०) रा. संगमेश्वर, कल्पना सुरेश भिंगार्डे (५०), शितल राकेश वाडकर (२८) रा. रत्नागिरी, अलका हेमंत कळसकर, सिया रविंद्र वाडे (प), नम्रता राजेंद्र पिंपळकर (48) प्रणय राजेंद्र निमकर (२५), शुभांगी साळवी (४६) रा. चिपळुण, अख्तरी झाकीरहसैन सावंत (४७) रा. दापोली, नितेश कृष्णा पांचाळ (३२)करतवडे अशी जखमींची नावे आहेत.
सर्व जखमींवर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालायत उपचार सुरु आहेत. खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून
या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button