वैश्य युवा रत्नागिरी तर्फे आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन
शनीवार दिनांक २८/८/२०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून 1वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिर रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने वैश्य युवा रत्नागिरी तर्फे प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये अस्थिविषयक आजारांवर मोफत मार्गदर्शन आणि चेकप करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ.श्री.केतन पाटिल आणि श्री.रामेश्वर मेहेत्रे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमती फुले मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तरी इच्छुकांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा ही विनंती.अधिक माहीतीसाठी डॉ.वक्रतुंड शेट्ये (9673933111) यांच्याशी संपर्क साधावा. कृपया प्रत्येकाने मास्क लावून शिबीरात यावे असे आवाहन वैश्य युवा रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.
www.konkantoday.com