तुतारी एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या वाढविली
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या दादर-सावंतवाडी-दादर या तुतारी एक्स्प्रेसमध्ये २४ डबे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये एक थ्री टायर एसी, तीन स्लीपर कोच, एक सेकंड सिटींग कोचसह १९ डबे आहेत. त्यात आणखी पाच डब्यांची वाढ केली जाणार आहे. दि. ४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तुतारी एक्स्प्रेस वाढीव डब्यांसह धावणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी यातून ये-जा करावी, असे आवाहन कोकण रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com