भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक, अवघ्या काही मिनिटांत लागले नवे बॅनर
रत्नागिरी- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा रत्नागिरीत दाखल होण्यापूर्वी मारुती मंदिर सर्कल येथे काही समाजकंटकांनी भ्याडपणे बॅनर वाढल्याचा दावा भाजपा कार्यकर्त्यांनी केला हे बॅनर फाडल्यानंतर काही मिनीटांतच भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नवे बॅनर येथे लावून आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपची ताकद रत्नागिरीमध्ये आणि आता केंद्रीय मंत्री राणेसाहेब यांची पूर्ण पाठबळ असल्यामुळे भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
केंद्रीय मंत्री श्री. राणेसाहेब आता वांद्री येथे पोहोचले असून तिथून पुढे निवळी येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे आणि तिथून पुढे ३ च्या दरम्यान रत्नागिरीत दाखल होणार आहेत. सर्व नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दाखल झाले आहेत.
www.konkankantoday.com