
रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आलेली निवेदने आम्ही जशास तशी मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार: खा.विनायक राऊत
बारसू रिफायनरी प्रकल्प सरकारने अद्याप जाहिर केलेला नाही. नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे शिष्टमंडळ आणि बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे शिष्टमंडळ आम्हाला भेटून गेले आणि त्यांनी आम्हाला निवेदनही सादर केले. आज रविवारी रिफायनरी समर्थकांना आम्ही खासदार या नात्याने त्यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी वेळ दिला होता त्यानुसार सर्व समर्थक हजर आहेत. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बहुमताच्या बाजुने नक्किच असणार. आणि यात कोणताही बदल होणार नाही. मेजोरीटी पाहुनच प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल. बहुमत पाहुन राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. नाणार रिफायनरी हा विषय संपलेला आहे. त्यामुळे त्या भागातील लोकांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देऊ शकणार नाही असे मी स्पष्ट सांगितले आहे. बारसू परिसरातील रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आलेली निवेदने आम्ही जशास तशी मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार. २८ किंवा २९ ऑगस्टच्या दरम्याने मी ही निवेदने मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेन. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जो काही निर्णय देतील त्या अनुषंगाने आम्ही पुढे लोकप्रतिनिधी म्हणून काम करु. बारसू रिफायनरी बाबत सरकारचा निर्णय नसल्याने शिवसेना पक्ष त्याबाबत अद्याप काहीही भूमिका घेऊ शकत नाही. असे मत खासदार विनायक राऊत यांनी रविवारी राजापूर येथील बैठकीत व्यक्त केले.
बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांनी रविवारी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थीतांना संबोधित केले. यावेळी आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष जमीर खलिफे, अॅड.शशिकांत सुतार, अॅड.यशवंत कावतकर, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, जगदीश राजापकर, विनायक दिक्षीत, सुरज पेडणेकर, गौरव परांजपे, आदी उपस्थीत होते.
www.konkantoday.com