गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार

गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमानी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत गणोशोत्सव साजरा करण्याकरीता जाण्यासाठी कोकणवासीय चाकरमान्यांची प्रचंड ओढ आहे. महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोशाे उत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक,संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी ४सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button