
शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच होईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचना ‘टास्क फोर्स’ने केल्या आहेत. मात्र, अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे.याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्य सरकारने मध्यंतरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन दिवसाच हा निर्णय मागे घेण्यात आला. याबाबत पवार यांचा विचारले असता, ते म्हणाले, ”शाळा सुरू करण्याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘टास्क फोर्स’ने दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा निर्णय दिवाळीनंतरच होणार आहे
www.konkantoday.com