
रत्नागिरीत खेळांच्या साहित्याचे दुकान चोरट्यांनी फोडले*
_रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरातील खेळाच्या साहित्याचे दुकान चोरट्यांनी फोडून ५० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी समीर अन्वर मजगांवकर (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर अन्वर मजगांवकर (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांचे मारूती मंदिर येथील स्टेडियमच्या मागील बाजूस खेळाच्या साहित्याच दुकान आहे. ३० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडून ५० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com