महावितरणला थकित वीज बिलाची डोकेदुखी ,जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ६२ कोटी थकले
महावितरणची थकित वीज बिल डोकेदुखी झाली आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल भरले जात नसल्याने वीज तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आली होती. परंतु अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार २१८ वीज ग्राहकांकडे ६२ कोटी २६ लाख रक्कम थकित आहे. ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने आता अधिकार्यांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सध्या चिपळूण विभागातील ६१ हजार ४५० ग्राहकांकडे १९ कोटी १२ लाख रु. खेड विभागातील ४५ हजार २९७ ग्राहकांकडे १० कोटी १९ लाख तर रत्नागिरी विभागातील ७८ हजार ४७१ ग्राहकांकडे तब्बल २७ कोटी ९४ लाख एवढी वीज बिलाची रक्कम थकली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार २१८ वीज ग्राहकांकडे ६२ कोटी २६ लाख एवढी रक्कम थकीत आहे.
www.konkantoday.com