
फोटोग्राफर संस्थांतर्फे नेत्र तपासणी शिबीराद्वारे “जागतिक छायाचित्रण दिन” साजरा
रत्नागिरी -: रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 19 ऑगस्ट रोजी “जागतिक छायाचित्रण दिना”निमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. फोटोग्राफर व त्यांच्या परिवारासाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून “जागतिक छायाचित्रण दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
“जागतिक छायाचित्रण दिन” असल्याने फोटोग्राफर्ससाठी मुख्य घटक असलेल्या कॅमेऱ्याचे पूजन करून उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर यांच्या या उपक्रमाला INFIGO आय केअर हॉस्पिटलची मोलाची साथ लाभली. नेत्र तपासणी शिबीरावेळी शहरातील ज्येष्ठ उद्योजक प्रसन्न आंबुलकर व मांडवी पर्यटन संस्थेचेचे अध्यक्ष राजू कीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या महत्वपूर्ण उपक्रमाबरोबर गतिमंद मुलांच्या आशादीप संस्थेत जाऊन खाऊवाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे दिलीप रेडकर हे उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com