
पुण्यातील मोदींचे मंदिर झाकण्यात आले आणि मूर्ती एका रात्रीत हटवण्यात आली.,राष्ट्रवादीकडून मूर्ती चोरीची फिर्याद दाखल करणार
पुणे औंध येथील मोदींचे मंदिर उभारल्यानंतर मयुर मुंडे चर्चेत आले हाेते मोदींच्या या भक्ताने मोदींचे मंदीर बांधून दैवतीकरण केले होते.अशा प्रकारे मोदींचे मंदिर उभारण्यात आल्याने चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याने हे मंदिर हटवण्यात आले आहे. सर्वत्र टीका होऊ लागल्याने याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली.
पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यानंतर मंदिर झाकण्यात आले आणि मूर्ती एका रात्रीत हटवण्यात आली. मंदिरावर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून टाकण्यात आले असून, मूर्ती अज्ञातस्थळी हलवण्यात आली आहे.
दरम्यान, रात्रीपासून मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने देवच चोरीला गेल्याने आम्ही कुणाला साकडे घालायचे? आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ?, यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मूर्ती चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? म्हणत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले
www.konkantoday.com
