
कायदा बदल करताना सहकारी संस्थांची स्वायत्तता अधिक मजबूत व्हावी;- *अँड. दिपक पटवर्धन
आज सहकार आयुक्त मा.अनिल कवडे यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये 97 वी घटना दुरुस्ती रद्दबादल ठरल्यानंतर महाराष्ट्र सहकार कायद्यात करावयाचे बदल यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे अँड. विद्याधर अनास्कर डॉक्टर खंडागळे श्री. कोथमिरे हे अतिरिक्त निबंधक ,यांचेसह राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सहकार कायद्यात कशा पद्धतीचे बदल सुचवावेत यासंदर्भात साधक-बाधक चर्चा झाली. या चर्चेमध्ये सहकारी संस्थांना संपूर्ण स्वायत्तता प्राप्त झाली पाहिजे आणि या तत्त्वाला पूरक असे बदल असे बदल कायद्यात झाले पाहिजेत तसेच कलम 72 चा वापर करत सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रातिनिधिक उपस्थिती मध्ये घेण्यासंदर्भात आवश्यक तरतुदी करण्यात याव्यात कलम 49 चे माध्यमातून वसुलीसाठी उपयुक्त कलमाचा उपयोग करताना शासकीय अधिकाऱ्यांचे मिळत नसलेले सहकार्य त्यामुळे कमी होणारा वसुलीचा प्रभाव या संदर्भाने सहकार आयुक्तांनी सर्व शासकीय खात्यांना कलम 49 ची माहिती देणार परिपत्रक काढावे अशा सूचना मी केल्या असता सहकार आयुक्तांनी सर्व शासकीय कार्यालयांना कलम 49 (2) च्या सक्त कार्यवाही साठी परिपत्रकिय सूचना काढन्याचे मान्य केले.अशी माहिती दीपक पटवर्धन यांनी दिली.
सक्रिय सभासदाच्या संदर्भात काही सुधारणा काका साहेब कोयटे यांनी सुचवल्या तसेच लेखापरीक्षक नियुक्ती बाबत संस्थांचे अधिकार अबाधीत राहावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थित राहणे अन्यथा अक्रियाशील सभासद वर्गामध्ये वर्गवारी होणे संदर्भाने असलेले प्रावधान रद्द करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच सहकारात काम करणाऱ्या विविध संस्था त्यांची कार्यप्रणाली, आव्हाने यासंदर्भात येणाऱ्या सूचना आवश्यक असणारे बदल याबाबत वेळोवेळी प्रस्ताव तयार करण्यासाठी विविध गटांची नियुक्ती करत त्यामध्ये चर्चा करून धोरणात्मक बदल सुचवण्यात यावेत असे विद्याधर अनास्कर यांनी सुचवले. या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशिक्षण पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती या बैठकीचे प्रतिनिधी आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी दिली.