
खारवी समाज नागरी पतसंस्थेने 97.03% वसुली करत मिळविला 32 लाख 4 हजाराचा निव्वळ नफा. – संतोष पावरी
◆स्थापना:- 20/11/2018
◆संस्था कालावधी:- 6 वर्षे
◆शाखा:- प्रधान कार्यालय व 5 शाखा*
■ आर्थिक विवरण ३१ मार्च २०२५ अखेर.*
➡️ एकत्रित व्यवसाय 31 कोटी 39 लाख
➡️ ठेवी – 19 कोटी 11 लाख
➡️ कर्ज – 12 कोटी 28लाख
➡️ गुंतवणूक – 08 कोटी 43 लाख
➡️ वसुली – 97.03%
➡️ निव्वळ नफा – 32 लाख 04 हजार
➡️ सी.डी. रेशो – 56.98 %
➡️ स्वनिधी – 01कोटी 96 लाख
➡️ CRAR – 15.15%
➡️ नेट एनपीए – 2.73 %
*व्यवसाय वृद्धीचे प्रमाण*
●प्रतिवर्षप्रमाणेच या आर्थिक वर्ष अखेरीला संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी केली असून मागील वर्षाच्या तुलनेत,
●संस्थेचे खेळते भांडवलामध्ये 28.59% या प्रमाणात वाढ
●संस्थेचा स्वनिधी 12.64% या प्रमाणात वाढ
●ठेवीत 29.12 % या प्रमाणात वाढ
●कर्ज वितरणात 10.13% या प्रमाणात वाढ
● गुंतवणूकित 77.85% या प्रमाणात वाढ
●निव्वळ नफा 6.76% या प्रामाणात वाढ.
५५०० पेक्षा जास्त सभासदांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्याच ब्रीदवाक्य उराशी बाळगून सहकार क्षेत्रातला हा प्रवास सुरू आहे.०६ वर्षांचा मागोवा घेताना जाणवत ते समाधान कारण हा प्रवास पूर्ण पारदर्शकआहे.सचोटी ,प्रामाणिकपणा ,शिस्तीच बाळकडू यावर मी आणि माझी सर्व टीम संस्थाकार्यात मग्न आहे.
प्रारंभीचा अडखळणारा कालखंड , कालांतराने अंतर्गत आव्हानांनी व्यापलेला कालखंड यातून तावून सुलाखून गेल्या ०६ वर्षात संस्थेने केलेली प्रगती ही न भूतो अशीच राहीलेली आहे.
प्रधान कार्यालय ते ०५ शाखा हा विस्तार सर्व शाखांत चाललेला उत्तम व्यवहार सातत्यपूर्ण नफा वाढता ग्राहक वर्ग हे सर्व अनुभवताना कृतार्थेतेचा भाव मनी दाटतो.
ठेवीदारांचे श्रमाचे विश्वासाने गुंतवलेले पैसे संरक्षित ठेवणे कर्जदाराना कर्ज वितरीत करून त्या कर्जाची नेटकी वसुली करणे हा प्रमुख उद्देश हे कर्तव्य नेकीने आणि नेटाने करत खारवी सामाज नागरी पतसंस्थेचे अर्थविश्व डिजिटल युगात ही मार्गस्थ होताना साथ देणाऱ्या सर्व सभासदांना सर्व संबंधित आस्थापनांना खरतर सर्व समाजाला धन्यवाद देताना भविष्यकालीन वाटचालीसाठी असेच स्नेहपूर्ण सहकार्य व सदिच्छा मिळत राहाव्यात व संस्थेचं अर्थकारण असंच तेजळात रहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना ग्राहकांचा विश्वास जपत , पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना सर्व ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी यांचा मोलाचा वाटा असून संस्था या सर्वांचीच ऋणी आहे. सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिले. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. व आगामी वाटचालीमध्ये अशाच पद्धतीने सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो.