
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी केंद्र सरकारकडून पाठविलेल्या व्हेंटीलेटर पैकी निम्म्याहून अधिक बंद असल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी केंद्र सरकारकडून व्हेंटीलेटर पाठविण्यात आले होते. त्यापैकी निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहेत असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी आढावा बैठकीत मांडले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे याची तपासणी करुन अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री अँड.अनिल परब यांनी दिल्या.
पालकमंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदिंची उपस्थिती होती.यातील लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते
www.konkantoday.com