
महावितरणच्या कार्यालयात समन्वय नसल्याने होतोय लोकांच्या जीवाशी खेळ ,नागरिकांनी तक्रार करुनदेखील महावितरणची यंत्रणा हलली नाही
( आंनद पेडणेकर) शिरगाव MSEB कार्यालय आणि नाचणे पॉवर हाऊस या दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्या कारणाने आणि दोन्ही मधील हद्दीच्या कारणास्तव तक्रार घेताना नागरिकांना उडवा उडविची उत्तरे दिली जात आहेत असाच एक प्रकार रात्री घडला रत्नागिरी शहरातील उद्यमनगर रोडवर सिमेंट पाईप फॅक्टरीजवळ. ११ KV ओव्हरहेड वायर ला २ पोलांच्या मध्यभागी स्पारकिंग होऊन एक बारीक वायर फक्त तुटायची राहिली आहे.ही वायर तुटल्यास मोठा अनर्थ होईल अशी नागरिकांची भीती आहे याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन वस्तुस्थिती पाहणे गरजेचे होते .या बाबत जागृत नागरिकांनी नाचणे पॉवर हाऊस ला तक्रार केली असता हा भाग आमच्याकडे येत नाही असे सांगितले जाते. वस्तुस्थिती अशी आहे आपत्कालीन परिस्थितीत हद्दीचा वाद सोडून तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे असताना शिरगाव MSEB कडे तक्रार करा असे सांगितले जाते. शिरगाव MSEB चा तक्रार क्रमांक सदैव व्यस्त असतो, येथील इंजिनिअर ला फोन केला असता ऑफिस मध्ये तक्रार करा,त्यानंतर मी तपासणी साठी कर्मचारी पाठवतो असे सांगितले गेले आतापर्यंत तरी त्याठिकाणी कोणताही कर्मचारी अद्याप आलेला नाही. नागरिकांनी जागृतता दाखवून महावितरणला याबाबत कळविल्यानंतर जर दखल घेणार नसेल तर मग या निष्काळजीपणामुळे असे म्हणावेसे वाटते की महावितरण मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निदान या जागेवर येऊन वस्तुस्थिती पाहणे गरजेचे होते परंतु त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्यात संतापाचे वातावरण आहे
www.konkantoday.com