
गुहागर येथील समुद्र किनार्यावर हंगामातील ऑलिव्ह कासवाचे पहिले घरटे.
गुहागर येथील समुद्र किनार्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचार्यंनी या घरट्यातील ११७ अंडी संरक्षित केली आहेत. नव्या हंगामातील राज्यातील पहिले घरटे मिळणारा गुहागर हा या वर्षाचा पहिला समुद्र किनारा आहे. गुहागर बाग परिसरातील समुद्र किनार्यावर शुक्रवारी कासवमित्र फिरत होते. त्यावेळी समुद्र किनार्यावर अंडी घालून गेलेल्या कासवाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. या खुणांचा मागोवा घेतल्यावर कासव मित्रांना घरटे सापडले.www.konkantoday.com