
अम्फान या वादळ वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान
ताशी १६० ते १८० किमीच्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठी नासधूस झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळामुळे १०ते १२ जण ठार झाल्याची माहिती आहे. कोलकाताच्या अनेक भागात पूर आला आहे. कोलकाता विमानतळावर या वादळाचा परिणाम दिसतोय. इथे सर्वत्र पाणी भरलेलं आहे.
६तासांच्या अम्फान या वादळ वाऱ्यामुळे कोलकाता विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे पाणी भरले आहे. रनवे आणि हॅंगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाचा एक भाग पाण्याखाली आहे. अम्फानमुळे विमानतळावरील सर्व कामकाज आज पहाटे पाच वाजेपर्यंत बंद होती, जी अजूनही बंद आहेत.
www.konkantoday.com