अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी , आज १४ ऑगस्टपासून राज्यभरात अकरावी प्रवेशाला सुरुवात
अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा जीआर जारी केल्यानंतर शुक्रवारी शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले आहे. आज १४ ऑगस्टपासून राज्यभरात अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी करण्याबरोबरच अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. तसेच अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ातील जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी दिली.
शिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे तात्पुरते वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दुसरी फेरी, 5 ते 11 सप्टेंबर तिसरी फेरी आणि 12 ते 17 सप्टेंबरदरम्यान पुढील फेरी होणार आहे.
www.konkantoday.com