दोन वर्षे पूर्ण झालेल्या सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा ratnagiri district bank elections
मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची मतदार यादी नव्याने करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण सहकारी संस्था या मोहिमेतील नव्याने निर्माण होऊन दोन वर्षे पूर्ण झालेल्या सहकारी संस्थांना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा.अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि कल्पवृक्ष पर्यटन विषयक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मागणी केली आहे
www.konkantoday.com