शिक्षक सक्षमीकरणासाठी टीचर टॉक ऍपचे समाजसेवक रामचंद्र दळवी यांच्या मार्फत लोकार्पण

शिक्षक सक्षमीकरणासाठी टीचर टॉक, ऍपचे समाजसेवक श्री.रामचंद्र दळवी यांच्या मार्फत नुकतंच लोकार्पण करण्यात आलं.
 सहकारी शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी, मतांची देवाणघेवाण करण्यासाठी, समस्या निवारणासाठी तसेच टिकाटिप्पणी सामायिक (शेअर) करण्यासाठीचे व्यासपीठ अर्थात टीचर्स टॉक (TCHRTALK ) हे एक विशेष अप्लीकेशन आहे. हे ऍप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्यासोबत शिक्षक समुदायाच्या उन्नतीसाठीही काम करेल. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री.रामचंद्र दळवी यांनी या टीचर टॉक (TCHRTALK )या ऍपचे नुकतेच लोकार्पण केले. सदर ऍप टीच ओ टीच सोशल संस्थेने विकसित केले आहे.  
 डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात सुसंगत शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा यादृष्टीने सदर ऍपची निर्मिती केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल आणि शिक्षकांचा सन्मानही वाढले. सदर ऍपमुळे शिक्षक, सल्लागार समिती, शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची दरी नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट (#TransformingTheEducation#)  करणे हे या ऍपचे उद्दीष्ट्य आहे.
नोंदणीकृत शिक्षक या नव्या ऍपद्वारे, सर्वेक्षण (ओपिनिएन पोल) करू शकतात, स्थानिक प्रश्न सोडवू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात, स्थानिक घटनांबद्दल स्वत:ला अदययावतही करू शकतात. याशिवाय सवलतीच्या दरात घरगुती अन्य वस्तू खरेदी करू शकतात. सदर ऍप गुगल प्ले स्टोअर  वर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे.
“शिक्षकांच्या गरजा आम्ही जाणतो. एस आर दळवी (आय) फाऊंडेशन  शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच स्थापन करण्यात आले आहे. या फाऊंडेशनद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक समस्या निश्चितच सोडविल्या जातील. शिक्षकांच्या मूलभूत तत्वांचा मजबूत पाया तयार करण्यासाठी या ऍपची मदत होईल. जगावर अधिराज्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या ऍपमुळे मदत होईल पण त्यासोबतच अडचणीही दूर केल्या जातील . राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका शिक्षकांनी बजावली आहे आणि सदय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी  #TransformingTheEducation#”  शिक्षकांना आम्ही नक्की मदत करू असे एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी म्हणाले. ”
“विद्यार्थी तसेच शिक्षकांची प्रगती आणि समाधान हे आमच्या अस्तित्वाचे मूळ आहे. आम्हाला शिक्षकांशी  सखोल आणि सकारात्मक संबंध स्थापित करायचा आहेच पण तो आत्मविश्वासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण हवा  ” असे श्री. दळवी पुढे म्हणाले. 
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button