
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे अपघात कंटेनर नदीत कोसळलेला
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात मोठय़ा प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत आहेत. काल संगमेश्वर नजिकच्या शास्त्री पुलावरून जाणाऱ्या कंटेनर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर खाली नदीत कोसळला. ही घटना पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .कंटेनर नदीच्या पाण्यात गेल्याने चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते ,तसेच हा कंटेनर वर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आले होत्या.
www.konkantoday.com