छायाचित्रासह मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर

रत्नागिरी दि. 12 : भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर केलेला आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे

        9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्रुटी दूर करणे,

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) कडून घरोघरी तपासणी/पडताळणी, योग्यप्रकारे विभाग/भाग तयार करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे.
उक्त कार्यक्रमानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून सदर मतदार यादीवर हरकती व दावे दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सादर करता येणार आहेत.
उपरोक्त कालावधीत प्राप्त हरकती व दावे हे 20 डिसेंबर, 2021 पर्यंत निकाली काढून त्यावर निर्णय घेण्यात येईल व *अंतिम मतदार यादी 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
मतदार यादीचे अद्यावतीकरण करण्यासाठी प्रामुख्याने पुढीलप्रमाणे नमुने वापरले जातात. मतदार यादीत नाव दाखल करणे यासाठी नमुना ६, अनिवासी भारतीयाचे नाव मतदार यादीत दाखल करणे यासाठी नमुना ६अ, मतदार यादीतील नाव वगळणे यासाठी नमुना ७, मतदार यादीतील मतदाराचे तपशिलात दुरुस्ती करणे साठी नमुना ८, मतदाराचा निवास बदलल्यास विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भाग बदलणे साठी ८अ.
हरकती व दावे सादर करण्यासाठी उक्त नमुना अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर दावे व हरकती बाबत मतदार नोंदणीचे ऑफलाईन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा BLO मार्फत सादर करण्यात यावेत, किंवा
ऑनलाईन अर्ज www.nvsp.in या संकेत स्थळावर व Voter Helpline या Mobile App वर देखील सादर करता येतील. तरी सर्व नागरिकांनी या पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेवून रत्नागिरी जिल्हयाची मतदार यादी अचूक व सुदृढ होणेसाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button