
बेस्टच्या ताफ्यात तब्बल १ हजार ८०० इलेक्ट्रिक बसचा ताफा दाखल होणार mumbai electric bus inauguration
आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणाची सांगड घालत बेस्टच्या ताफ्यात तब्बल १ हजार ८०० इलेक्ट्रिक बसचा ताफा दाखल होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना बसमध्ये येण्यासाठी व्हिलचेअरची सुविधा, जीपीएस तंत्रज्ञान, आपत्कालीन परिस्थितीत पॅनिक बटण आणि एअर सस्पेशन्स अशा सुविधा असलेल्या एसी बसमधून प्रवास करण्याची प्रवाशांना पर्वणी मिळणार आहे. माहीम बस डेपोमध्ये बेस्टच्या नवीन २४ इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त लोकार्पण झाले.
www.konkantoday.com