
शारीरिक संबंध ठेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून व तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल अनंत जाधव राहणार माभळे संगमेश्वर या तरुणाविरुद्ध देवरूख पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अमोल याचा संबंधित तरुणीचे बराेबर फेसबुक व मोबाइलद्वारे संपर्क होता तेथून प्रेमसंबंध निर्माण झालेतरूणीच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता मात्र अमोल हा तरुणीवर संशय धरून शिवीगाळ करत होता त्यामुळे या तरुणीने लग्नाला नकार दिला त्यानंतर अमोल याने सदर तरुणीला असुर्डे येथे जंगलात बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर वेळोवेळी त्याने असे प्रकार केले अमोल याच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणीने विष करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com