FedEx Express ने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पोहोचवल्या fedexhelp for flood affected areas

, मुंबई,: FedEx Corp ची (एनवायएसई: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी FedEx Express महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये सहयोग देत आहे. FedEx Express ने मुंबईहून रायगड जिल्ह्यातील महाड येथे १४ टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ व स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोचत्या केल्या आहेत.

अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अनेक लोकांच्या जीवनावर खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो याची FedEx Express ला पुरेपूर जाणीव आहे. हे मदतकार्य कंपनीच्या FedEx Cares “डिलिव्हरिंग फॉर गुड” उपक्रमाचा एक भाग आहे. यामध्ये FedEx Express ही कंपनी आपले जागतिक नेटवर्क व अतुलनीय लॉजिस्टिक्स नैपुण्ये यांचा वापर करून आपत्तीच्या काळात गरजेनुसार अत्यावश्यक मदत पुरवणाऱ्या संघटनांना मदत करते.

FedEx Express च्या इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहमद सायेघ यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील पुरामध्ये नुकसान झालेल्यांबद्दल आमच्या मनात संपूर्ण सहानुभूती आहे आणि म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गरजूंना अत्यावश्यक वस्तू पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये साथ देत आहोत.”

युनायटेड वे मुंबईचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जॉर्ज ऐकारा यांनी सांगितले, “गरजूंपर्यंत मदतीची किट्स पोहोचवण्यासाठी FedExने त्यांचा नेटवर्कचा उपयोग करवून दिला याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. पुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना आपले जीवन पुन्हा सुरु करता यावे यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू या किट्समध्ये आहेत, ज्या विविध कॉर्पोरेट साथीदारांच्या मदतीने उभ्या करण्यात आल्या आहेत. किट्सच्या वाहतुकीवरील खर्चात बचत झाल्याने आम्हाला किट्सची संख्या वाढवण्यात खूप मोठी मदत मिळाली आणि त्यामुळे आता अधिक जास्त कुटुंबांना मदत मिळाली आहे.”
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button