भटके- विमुक्तांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही -ना. नारायण राणे msme minister narayan rane

0
119

विमुक्त धुमंतू तथा अर्धघुधंतू जनजाति विकास एवं कल्याण बोर्ड ( भारत सरकार ) अध्यक्ष दादा इदाते यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळीअनेक विषयांवर चर्चा झाली.
केंद्र सरकारमध्ये MSME कॅबिनेट मंत्री पदावर ना. नारायण राणे यांची निवड झाल्याबद्दल दादा इदाते यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ना. राणे यांनी भटके- विमुक्तांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली विशेषत: भटके-विमुक्तांना आपण नक्कीच मदत करु. आपण एकदा या विषयावर सविस्तर चर्चा करू अशी सूचना त्यांनी केली. तसेच कोकणच्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी दादा इदाते यांच्या समवेत अजित आंब्रे हेदेखील उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here