सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पूला साठी सहा कोटी मंजुर malharpool road
कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पूल कोसळला आहे.
या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने ६ कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पूल कोसळ्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com