
महामार्गाच्या कामातील त्रुटी दर्शवत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी , राजापूर मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा rajapur mns
आगामी गणेशोत्सवात चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांना महामार्गाच्या कामातील त्रुटी दर्शवत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.
मनसेचे राजापूर उपतालुका अध्यक्ष पुरूषोत्तम खोबल यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम खाते व के. सी. सी. कंपनीला आठ दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. यावेळी निदर्शनास आणून दिलेली कामे पूर्ण झाली नाहीत, तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, त्यानंतर होणार्या परिणामांना सर्वस्वी बांधकाम खात्याचे अधिकारी व के.सी.सी. कंपनी जबाबदार असेल असा इशारा खांबल यांनी दिला आहे.
www.konkantoday.com




