
दीपक केसरकरांच्या दंडात ताकद नाही, केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या मोतीतलावावरचा डोम कावळा- संजय राऊत भडकले
रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असा दावा विरोधकांकडून करण्यात आला त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कडाडले असून त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.खासदार संजय राऊत म्हणाले की, रश्मी ठाकरे – पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ कार्यालयाने खुलासा करावा. केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुसरे काही काम नाही. ते अस्वस्थ झालेत. ते भाजपाचे, मोदींचे गुलाम बनलेत. अशाप्रकारे भेट झाली असं ते म्हणत असतील तर PMO कडून खुलासा करा, या तारखेला भेट झाली वैगेरे. आम्ही कुणाला भेटलो नाही. भेटणार नाही असं राऊतांनी स्पष्ट केले. त्याचसोबत दीपक केसरकरांच्या दंडात ताकद नाही. सावंतवाडीच्या मोतीतलावावरचा डोम कावळा आहे. लोक हाडहाड करतात. हा डोम कावळा आमची ताकद दाखवतो, हिंमत असेल तर निवडणुकीत उभे राहा आणि सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवा असं आव्हानही राऊतांनी दिले आहे. www.konkantoday.com