
लोटे येथे लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती नजीक माळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका घरातून लाखो रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनापरवाना देशी विदेशी दारू विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री.वाय.एम.पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापुर व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा प्रभारी अधीक्षक श्री.व्ही.व्ही.वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ रोजी खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक नजीकच्या माळवाडी येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी निहार हेमंत वारणकर यांच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत एका बंदिस्त खोलीत लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा आदळून आला.
या कारवाईत अवैद्य गोवा बनावटीच्या मद्य साठ्यात १८० मि.लि. व ७५० मि.लि. च्या गोल्डन अंश ब्ल्यु फाईन व्हिस्कि, बॉम्बे रॉयल व्हिस्कि, मॅकडॉल नं.१ रिझर्व्ह व्हिस्कि असे एकुण २७ बॉक्समध्ये सुमारे १ लाख ६४ हजार ४०० रुपये एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी निहार हेमंत वारणकर रा.मु.पो.लोटे माळवाडी ता.खेड जि.रत्नागिरी याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा बनावटीची दारू येथे आणून ती इथे विकणारा खरा सूत्रधार कोण याचा आता शोध घेतला जात आहे गोवा मद्य आयात करणारा मुख्य सुत्रधार कोण आहे?
कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक श्री.शंकर जाधव तसेच निरीक्षक श्री.व्ही.व्ही.सकपाळ, सहायक दुययम निरीक्षक श्री.आर.बी.भालेकर, जवान श्री.ए. के.बर्वे यांनी भाग घेतला. सदर गुन्हयांचा पुढिल तपास दुय्यम निरीक्षक श्री.विशाल सकपाळ करीत आहेत.
www.konkantoday.com