श्रीगणेश उत्सवाकरीता रेल्वे ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार ganpatispecial trains on konkanrailway routes

श्रीगणेश उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे. श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. मुंबई- सावंतवाडी रोड विशेष (२ फे-या)

Ganpati special train on konkan railway routes.40more trains on route.

01235 विशेष दि. ७.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
01236 विशेष दि.१०.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ

२. पनवेल- सावंतवाडी रोड विशेष (४ फेऱ्या)
01237 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी पनवेल येथून १४.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
01238 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

संरचना: 01235/01236 आणि 01237/01238 विशेष ट्रेनसाठी : १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

  1. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (६ फेऱ्या)
    01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी ०५.३३ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.
    01240 विशेष मडगाव येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
संरचना: २० द्वितीय आसन श्रेणी

  1. लोकमान्य टिळक टर्मिनस- कुडाळ विशेष (६ फेऱ्या)
    01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.
    01242 विशेष कुडाळ येथून दि. ५.९.२०२१, ८.९.२०२१ व १२.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

५. पनवेल-कुडाळ विशेष (६ फेऱ्या)
01243 विशेष पनवेल येथून दि. ४.९.२०२१, ८.९.२०२१ व ११.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.
01244 विशेष कुडाळ येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

  1. पनवेल- कुडाळ विशेष (४ फेऱ्या)
    01245 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२१ आणि १२.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.
    01246 विशेष कुडाळ येथून दि. ४.९.२०२१ आणि ११.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

  1. पुणे- मडगाव/करमळी- पुणे विशेष (२ फेऱ्या)
    01247 विशेष दि.८.९.२०२१ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.
    01248 विशेष करमळी येथून दि. १०.९.२०२१ रोजी १५.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

  1. पनवेल – करमळी/मडगाव- पनवेल विशेष (२ फेऱ्या)
    01249 विशेष पनवेल येथून दि.१०.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.
    01250 विशेष मडगाव येथून दि. ९.९.२०२१ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.

आधी घोषित केलेल्या श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या

वर नमूद विशेष ट्रेन व्यतिरिक्त, आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या (८) खालील प्रमाणे चालविण्यात येतील:
01227 मुंबई- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
01228 सावंतवाडी रोड-मुंबई विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
01229 मुंबई- रत्नागिरी विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.
01230 रत्नागिरी- मुंबई विशेष दि.५.९.२०२१ रोजी.
01234 रत्नागिरी- पनवेल विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.
01231 पनवेल- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
01232 सावंतवाडी रोड -पनवेल विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
01233 पनवेल- रत्नागिरी विशेष दि. ५.९.२०२१ रोजी.

आरक्षण: वरील अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आणि आधीच घोषित केलेल्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यासाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७.८.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.

सविस्तर थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करावे.

या विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच चढताना, प्रवासा दरम्यान आणि गंतव्यस्थानकावर कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून प्रवासाची परवानगी असेल.


दिनांक: ५ ऑगस्ट २०२१
प्रप क्रमांक 2021/08/04
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button