तुषार आग्रे यांन सुपिक कल्पनेतून करवंटीपासून बनविल्या राख्या coconut Shell rakhis
रत्नागिरीत प्रसिद्ध स्वराज्य एंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा तुषार आग्रे यांनी चक्क नारळाच्या करवंटीपासून आकर्षक राख्या बनविल्या आहेत. अतिशय आकर्षक व सुंदर अशा एक ते दोन इंचाच्या राख्या बहिणींच्या नक्कीच पसंतीस उतरतील अशी आशा आग्रे यांनी व्यक्त केली आहे.
Coconut Shell rakhis made by young entrepreneur in Ratnagiri Mr.Tushar agre
नारळाच्या झाडामध्ये दररोज नवनवीन संशोधन करून झाडाच्या मालकाला नरळाबरोबरच झाडाच्या इतर अवयवांपासून उत्पन्न मिळवून देण्यासाठी नारळाच्या झाडाचे महत्व श्री. आग्रे नेहमीच पटवून देतात. संगोपन, झाडापासून अधिकाधिक उत्पन्न, नवनवीन संशोधन अशा विविध पातळ्यांवर काम करणार्या श्री. आग्रे यांनी यावर्षी स्वतःच्या कल्पनेतून करवंटीपासून सुंदर अशा २४ डिझाईनच्या राख्या बनविल्या आहेत. एका राखीची किंमत ६५ रुपये असून या राख्या त्यांनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. श्री. आग्रे यांच्या खालच्याआळीमधील सोहम रेसिडेन्सी येथील कार्यालयात या राख्या उपलब्ध आहेत.
एक व दोन इंचाच्या आकर्षक राख्या त्यांनी बनविल्या आहेत. करवंटीला आकर्षक आकार देवून त्यावर वार्निश लावल्याने करवंटी अधिकच खुलून दिसते. त्यावरील नक्षीकाम नजरेत भरते. श्री. आग्रे यांच्या सुपिक कल्पनेतून करवंटीपासून बनविलेल्या राख्या बहिणी नक्कीच भावाला भेट देतील यात शंका नाही.
www.konkantoday.com