प्रशासनाने सर्वेक्षण करून पुरग्रस्त दिव्यांग पुनर्वसन आराखडा तयार करावा

आस्था सोशल फाऊंडेशनने चिपळूण येथील दिव्यांग पूरग्रस्तांचे सर्वेक्षण केले. त्यात पुनर्वसन कार्याचे नियोजन, प्राधान्यक्रम तत्परता व दिव्यांग या जोखीमप्रवण घटकांबद्दल कोणतीही विशेष संवेदनशीलता प्रशासनाने घेतलेली दिसून आली नाही, ही खंत आहे. कोणत्याही मोठ्या आपत्तीत नेहमीच लहान मुले, स्त्रिया व दिव्यांग व्यक्ती यांच्यावर सर्वात जास्त आघात होत असतो, हे विचारात घेवून आस्था व चाईल्डलाईन एकत्र काम करीत आहे. प्रशासनानेही सर्वेक्षण करून पुरग्रस्त दिव्यांग पुनर्वसन आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी मागणी आस्था साेशल फाऊंडेशनने केली आहे.
www.konksntodoy.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button