
तब्बल १६ वेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची विविध पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षेला केवळ ६० टक्के उमेदवारांची उपस्थिती
गेल्या दीड-दोन वर्षांत कोरोनामुळे तब्बल १६ वेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची विविध पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी राज्यभरात सुरळीत पार पडली.मात्र, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी केवळ ६० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यभरातील १ हजार १६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण अशा विविध कारणांमुळे एकूण सहावेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली. ही परीक्षा घेण्यासाठी उमेदवारांनी मार्चमध्ये पुण्यात तीव्र आंदोलनही केले होते. एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार नोंदणी आणि सर्वाधिक परीक्षा केंद्रे होती.
www.konkantoday.com