आरक्षण देण्याचे अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार -केंद्राचा निर्णय reservations rights will be given to states
आरक्षण देण्याचे अधिकार आता राज्य सरकारांना मिळणार आहे. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला.
याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली, असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देण्याबाबतचा अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहे
www.konkantoday.com